नवऱ्या वरील कविता

Poem Info
नवऱ्या वरील कविता
405 words
0
483
00
Poem does not have any tags
Share this Poem

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

♦ *विवाहित पूरूषांचे कधीही प्रगट न होणारे अंतर्मन सुंदर शब्दांत* *गुंफलेले एक सुंदर काव्य.* *प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि शक्य झाल्यास त्यांच्या मुला / मुलिंनी देखील जरूर वाचावे.*
👇🏼
|| ♦ *आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली* ♦ *असेल पण नवऱ्या वरील कविता एकदा वाचा* ||♦

*👳‍♂️नवरा म्हणजे समुद्राचा*
**भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
**पाय रोवून ताठ ll*

♦ *कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
**तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा ll*

*♦सर्वांच्या कल्याणा करता*
**पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
**डोक्यावर घेऊन चालत राहतो ll*

*♦कधी कधी बायकोलाही*
**त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
**मशाली सारखं जळत असतं ll*

*♦नवरा आपल्या दुःखाचं*
**कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
**पण कुणाला सांगत नाही ll*

*♦बायकोचं मन हळवं आहे*
**याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
**अनेक बायकात उणीव असते ll*

*♦सारं काही कळत असून*
**नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
**पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll*

*♦सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
**मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
**तो सुखी होत असतो ll*

♦ *इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
**वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*

♦ *त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
**नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका ll*

*♦दोस्ता जवळ आपलं मन*
**त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
**जोर जोरात रडावं वाटतं ll*

*♦समजू नका नवरा म्हणजे*
**नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
**हा सिद्धांत खोटा आहे ll*

*♦मी म्हणून टिकले इथं*
**दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
**नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*

♦ *घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
**बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*

*♦सारख्या सारख्या किरकिरीनं*
**त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
**खूप खूप अधीर होतं ll*

♦ *घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
**घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*

*♦नवरा म्हणा , वडील म्हणा*
**कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
**कुणाची आसवं गळतात का ? ll*

♦ *पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
**कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही ll*

♦ *वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
**सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो ll*

♦ *बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
**फार काही नकोय Iत्याला*
*दोन घोट सुख घेऊ
*द्यावं ll*

♦ *मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
**नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ?

🙏*माझ्या सर्व विवाहित मित्रांसाठी समर्पित* 🙏
💐💐💐💐💐 🌺🌺🌺🌺🌺

★★★

Please rate this poem
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Poem